Ad will apear here
Next
‘गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील’
पुणे : ‘सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना विविध प्रश्नांत मार्गदर्शन करण्याचे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे महत्त्वपूर्ण  आहे, त्यामुळे जीएसटीपासून केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू,’ असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले.

तीन सप्टेंबरला सकाळी खासदार चव्हाण यांनी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या नारायण पेठ येथील कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांचे प्रश्न समजावून घेतले आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचे प्रशिक्षण, जनजागृती, पर्यावरण रक्षण यासाठी एकत्रित प्रयत्नांबाबत या वेळी चर्चा झाली; तसेच गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्र ऑक्टोबरमध्ये घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

‘सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी जमा केलेल्या देखभाल खर्चावर जीएसटीमध्ये सवलत मिळावी, यासाठी दिल्लीत प्रयत्न करू,’ असे खासदार चव्हाण यांनी सांगितले.

या वेळी महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मनिषा कोष्टी, गृहनिर्माण महासंघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZXXBS
Similar Posts
‘जीएसटी अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील’ पुणे : ‘गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. यामध्ये लेखापाल (सीए) आणि कर सल्लागार यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे. या दोन्ही कायद्यात काही अडचणी येत आहेत. त्यासाठी येत्या काळात
‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने सुशिक्षित वर्गापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत, आरोग्य क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात द्यावा,’ असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
‘आळेयुक्त झाडे’ उपक्रमाला सुरुवात पुणे : ‘झाडांचे सैनिक होऊ या, चला, झाडांना आळे करू या...’ अशी गर्जना करत, असंख्य निसर्गप्रेमी पुण्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकवटले. ‘वनराई’ आणि ‘आंघोळीची गोळी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘आळेयुक्त झाडे’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लोकमान्यनगर येथील जॉगर्स पार्कच्या प्रवेशद्वाराजवळील झाडांना आळे करून या उपक्रमाला सुरुवात झाली
पुणे विभागात निर्माण होणार तीन लाख नोकऱ्या पुणे : सार्वजनिक गुंतवणुकीबरोबरच जीएसटीची अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधेचा दर्जा देण्यात आल्याचा अनुकूल परिणाम लॉजिस्टिक्स क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांत पुणे विभागातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात तीन लाख ११ हजार तर, देशभरात तीन दशलक्ष रोजगार उपलब्ध होईल, असे टीमलीज सर्व्हिसेसने ‘इंडियन लॉजिस्टिक्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language